दुसऱ्या लाटेत ७८२ महिलांची नॉर्मल डिलेवरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:44+5:302021-06-24T04:15:44+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या कमालीची वाढलेली असताना महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयांत ७८२ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी ...

Normal delivery of 782 women in the second wave | दुसऱ्या लाटेत ७८२ महिलांची नॉर्मल डिलेवरी

दुसऱ्या लाटेत ७८२ महिलांची नॉर्मल डिलेवरी

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या कमालीची वाढलेली असताना महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयांत ७८२ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. रुग्णालय व्यवस्थापनाने काळजी घेत माता व बालकांना सुखरूप घरी पोहाेच करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल आणि मे, या तीन महिन्यांत गंभीर रुग्णांचा आकडा चार हजार पार गेला होता. गर्भधारणा झाल्यानंतर बाळ कसे वाढते आहे, हे पाहण्यासाठी काही कालावधीनंतर रक्त चाचण्या व सोनोग्राफी करावी लागते; परंतु कोरोनामुळे या चाचण्या करण्यात अडचणी आल्या. अनेक खासगी रुग्णालयांतील सेवा बंद होत्या. काहींनी तर चाचण्या करण्यास सपशेल नकार दिला. या अडचणींवर मात करीत चाचण्या करण्यात आल्या. महापालिकेनेही सोनोग्राफी व रक्ताच्या चाचण्या करण्याची सुविधा निर्माण केली होती. त्यामुळे मागील तीन महिन्यांत नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण समाधानकारक आहे. गर्भधारणा काळात कराव्या लागणाऱ्या चाचण्यांमध्ये खंड पडला नाही. चाचण्या करून महिला प्रसूतीसाठी येत होत्या. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

.............

तीन महिन्यांत झालेल्या प्रसूती

७८२

....

चाचण्या आवश्यकच

गर्भधारणा झाल्यानंतर काही दिवसांनी रक्त चाचण्या व सोनोग्राफी करणे आवश्यकच आहे. कोरोनाच्या काळात चाचण्या करण्यात अडचणी आल्या; परंतु बाळाची वाढ कशी होते आहे, हे पाहण्यासाठी चाचण्या करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही चाचण्या सुरूच होत्या. त्यात खंड पडलेला नव्हता. प्रसूतीपूर्व चाचण्या करणे आवश्यकच आहे, असे सांगण्यात आले.

...

- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. कोरोना काळातही कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयांत नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आल्या असून, माता व बालकांना सुखरूप घरी पोहोच करण्यात आले आहे. या काळात एकही अपंग बाळ जन्माला आलेले नाही.

- डॉ. सतीश राजूरकर, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

........

सूचना: सदर विषय डमीचा आहे.

Web Title: Normal delivery of 782 women in the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.