शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रिंगणातून नागवडेंची माघार

By admin | Updated: September 23, 2014 01:37 IST

श्रीगोंदा : चार-पाच वेळा विधानसभा लढविली. परंतु यश आले नाही. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होवो अथवा ना होवो पण एकास एक उमेदवार देण्यासाठी नागवडे परिवार

श्रीगोंदा : चार-पाच वेळा विधानसभा लढविली. परंतु यश आले नाही. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होवो अथवा ना होवो पण एकास एक उमेदवार देण्यासाठी नागवडे परिवार निवडणूक लढविणार नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी ढोकराई येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील आघाडी नेत्यांची वज्रमूठ बांधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करण्याचे आदेश दिले आहेत़ मतविभागणी टाळण्यासाठी पवारांच्या शब्दाला मान देण्याचा निर्णय नागवडेंनी घेतला अन् आघाडीतील कार्यकर्त्यांचा श्वास मोकळा झाला.नागवडे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक २३ दिवसावर आली आहे. ग्रामपंचायत, सोसायटी, नगरपालिका निवडणुकीत अल्प कालावधीत प्रचार यंत्रणा राबविताना बेजार होतो. मी कार्यकर्त्यांच्या भावना, प्रतिसाद समजू शकतो. परंतु भविष्यात काही तरी मिळवायचे असेल काही कटू निर्णय घ्यावे लागतात. आमदारकी म्हणजे सर्व काही नाही. समाज सेवेचे अनेक मार्ग आहेत. मोहिते पाटील, प्रसादराव तनपुरे व शंकरराव कोल्हे हे हत्तीचे बळ असणारे नेते आमदार नाहीत. मात्र माणसं संपली नाही. राज्याच्या राजकारणात तेवढाच दरारा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होवू नये़ सत्ता नसली तरी मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे.जि. प. चे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले की, तालुक्याचा कारभारी कपडे बदलल्या सारखा पक्ष बदलतो. ते रात्रीत भाजपात गेले. आता सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. सर्वजण एकत्र राहिले तर मतदारसंघात सत्ता परिवर्तनाचे स्वप्न साकार होईल.यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, अनिल वीर, बाळासाहेब गिरमकर, धनसिंग भोयटे, मंगला कौठाळे, उमा काटे, दिलीप गायकवाड, वसंत उंडे, रोहिदास पवार, माऊली रासकर, संतोष रोडे, बाळासाहेब कुरूमकर, जयश्री शेलार यांची भाषणे झाली.