निवृत्तीनाथांच्या पालखीने प्रवरा परिसर दुमदुमला

By Admin | Updated: June 20, 2014 00:38 IST2014-06-20T00:34:49+5:302014-06-20T00:38:18+5:30

बाभळेश्वर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे गुरुवारी (दि़१९) प्रवरा परिसरात आगमन झाले़.

Nivruttinath's palanqui Pravara campus Dumdum | निवृत्तीनाथांच्या पालखीने प्रवरा परिसर दुमदुमला

निवृत्तीनाथांच्या पालखीने प्रवरा परिसर दुमदुमला

बाभळेश्वर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे गुरुवारी (दि़१९) प्रवरा परिसरात आगमन झाले़ भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने प्रवरा परिसर दुमदुमला़
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या या दिंडीमध्ये धुळे, जळगाव, नाशिकसह नगर जिल्ह्यातील ४० दिंड्या सहभागी होतात़ यामध्ये जवळपास ४० ते ४५ हजार वारकरी सहभागी होतात़ ही दिंडी २८ दिवस पायी प्रवास आणि हरिनामाचा जय जय कार करीत श्री क्षेत्र पंढरपुरला जाते़ भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण दिंडीमार्ग हरिनामात तल्लीन करण्याची किमया या पालखी सोहळ्यामध्येच असते़ पायी दिंडी सोहळा म्हणजे आनंद उत्सव असतो़ जो या दिंडीमध्ये सहभागी होतो, त्यालाच हा आनंद अनुभवास येत असतो, असे निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे प्रमुख मुरलीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ या दिंडीचे लोणी येथे उपसरपंच अनिल विखे यांनी पूजन केले़ दानशुर ग्रामस्थांनी भाविकांना चहा-नाष्टा दिला़ (वार्ताहर)
असा आहे
दिंडीचा ताफा
संत निवृत्तीनाथांच्या दिंडीत ४० दिंड्या, ४० ते ४५ हजार वारकरी, चार वैद्यकिय पथके, २२ पाण्याचे टँकर, शंभर विविध प्रकारची वाहने दिंडीमध्ये आहेत़

Web Title: Nivruttinath's palanqui Pravara campus Dumdum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.