शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नेवासेत वाळू तस्करांच्या खब-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 18:07 IST

वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली.

नेवासा : वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली.नेवासा तालुक्यातील वाळूला बांधकाम क्षेत्रामध्ये या वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात वाळू तस्करांच्या अनेक टोळ्या आहेत. विविध भागांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसीलदारांना वेळोवेळी मिळत. त्यावर त्वरित कारवाई देखील केली जाते. मात्र तहसील पथकाला माहिती वाळू तस्करांनी माहित घेण्यासाठी खबरे ठेवले जात आहेत. हे खबरे तहसील कार्यालय तसेच गणपती चौक, बसस्थानक चौक, मधमेश्वर नगर ,आणि तहसीलदार यांच्या निवासस्थान परिसरात दररोज रात्रंदिवस तहसिलदारांवर लक्ष ठेवण्यासाठी असतात. मंगळवारी रात्री तहसीलदार तसेच त्यांचे पथक कारवाई करण्यासाठी बाहेर निघाले असता काही वाळू तस्करांचे खबरे तहसीलदार निवासाबाहेर तहसीलदारांवर लक्ष्य ठरून असल्याचे नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नेवासा पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना फोन करून याची माहिती कळवली. पोलिसांनी तसेच तहसिलदार पाटील यांनी संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार जणांविरुद्ध भा.द.वि.कलम १०७  व भा.द.वि.कलम ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करून भा. द. वि.कलम १२२ प्रमाणे अटक केली.     ‘‘वाळू तस्करीवर आळा घालणे खब-यांमुळे शक्य होत नाही. कारवाई वेळोवेळी चालूच असते परंतु अपयश येत असे. चार जणांवर प्रोसिडिंग करून न्यायालयीन कोठडीत त्यांना ठेवण्यात आले. यामुळे कायदा व सुव्यवस्था देखील या कारवाईने रोखण्यास मदत होणार आहे. खबर देणारे हे नेहमीच चौकाचौकात टोळक्याने उभे राहून खबर देत असतात. त्यातील अनेक जण नशेत असतात. पथकांना धमकावणे, पाठलाग करणे, महसूल कर्मचा-यांना दमदाटी करणे, हाणामारी करणे अशी दादागिरी चालू असते. नागरिक ही त्यांच्याविरुद्ध तक्रारही करत नाहीत. या कारवाईमुळे वाळू तस्करीला आळा बसेल. यापुढे ही अशी कारवाई सुरूच राहील.’’ - उमेश पाटील, तहसीलदार

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा