राष्ट्रीय पाठशाळेस आय.एस.ओ. मानांकन प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:31+5:302021-04-07T04:21:31+5:30
या मानांकनाचे प्रमाणपत्र महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रा. सुनील पंडित यांच्या हस्ते ...

राष्ट्रीय पाठशाळेस आय.एस.ओ. मानांकन प्राप्त
या मानांकनाचे प्रमाणपत्र महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रा. सुनील पंडित यांच्या हस्ते राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांना प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनपाचे विषयतज्ज्ञ अरुण पालवे उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी सुभाष पवार म्हणाले की, राष्ट्रीय पाठशाळेने आमूलाग्र बदल केल्याचे दिसत आहे. या संस्थेचे सचिव अॅड. विद्याधर काकडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व मार्गदर्शनाने तसेच मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे व सर्व शिक्षकांच्या परिश्रमामुळे शाळेचे रूप बदलले आहे. म्हणूनच गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी खासगी अनुदानित व्यवस्थापनाची ही पहिली शाळा आहे. प्रा.सुनील पंडित म्हणाले की, या शाळेने अनेक अधिकारी व नेतेसुद्धा घडविलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. गत वर्षभर कोरोनामुळे येथील शिक्षक ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत शाळेचे विद्यार्थी चमकत आहे. मुख्याध्यापक बोडखे यांनी स्वागत केले.
----------
फोटो-०६राष्ट्रीय पाठशाळा
राष्ट्रीय पाठशाळा विद्यालयास गुणवत्तापूर्ण व्यवस्थानाच्या कार्याबद्दल आय.एस.ओ मानांकन मिळाले. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक प्रा. सुनील पंडित यांच्या हस्ते राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.