नमो नमो संघटनेने शेतकऱ्यांसाठी काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:32+5:302021-02-05T06:30:32+5:30
नमो नमो भारत या संघटनेच्या संगमनेरचे तालुकाध्यक्षपदी अरविंद वाकचौरे, शहराध्यक्षपदी गणेश राहणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना ...

नमो नमो संघटनेने शेतकऱ्यांसाठी काम करावे
नमो नमो भारत या संघटनेच्या संगमनेरचे तालुकाध्यक्षपदी अरविंद वाकचौरे, शहराध्यक्षपदी गणेश राहणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र देताना आयोजित कार्यक्रमात इथापे बोलत होते. नमो नमो संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मुख्य समन्वयक सोपान उंडे, भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, नगरसेविका मेघा भगत, शेतकरी संघटनेचे संतोष रोहम, चंद्रकांत घुले, युवराज गुंजाळ, दीपेश ताटकर, शैलेश फटांगरे आदी उपस्थित होते.
नमो नमो संघटना राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व सामन्याचा विचार व्हावा यासाठी काम करत आहे, असे शहराध्यक्ष गणफुले म्हणाले. प्रास्ताविक गोरक्षनाथ राऊत यांनी केले. सूत्रसंचलन नंदू राहाणे यांनी केले. गणेश रहाणे यांनी आभार मानले.