अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा; पुन्हा सुरु झाली मागणी, मनसे विद्यार्थी सेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 21:18 IST2021-05-28T21:17:39+5:302021-05-28T21:18:25+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे, या मागणीसाठी कायनेटिक चौक येथील सर्कलला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले.

अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा; पुन्हा सुरु झाली मागणी, मनसे विद्यार्थी सेनेची निदर्शने
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे, या मागणीसाठी कायनेटिक चौक येथील सर्कलला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले.
सुमित वर्मा म्हणाले, आजपासून आम्ही नगरच्या नामांतराचा विषय मार्गी लावणार आहोत. यापूर्वीपासून आमची मागणी होती की, या शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे. आता यासाठी नगरच्या सर्व जनतेने आमच्या मागे उभे राहावे. आज आम्ही फक्त या चौकात नामांतराचे फलक लावले. काही दिवसांतच ते प्रत्येक ठिकाणी दिसतील, असे ते म्हणाले. औरंगाबादच्या नामांतरबाबतही मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगरमध्ये आंदोलन केले होते; परंतु आता नगरचे अंबिकानगर करावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, स्वप्निल वाघ, प्रमोद ठाकूर, योगेश गुंड, प्रकाश गायकवाड, गौरव जगदाळे, ओंकार काळे, पांडुरंग काळे, महादेव दहीफळे आदी उपिस्थत होते.