शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:54 IST

नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

विनायक चव्हाण । मिरजगाव : नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रित मुरुम टाकल्याने काही ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरात दुसºयांदा खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होत असून अनेक अपघातही होत आहेत.खड्ड्यांमध्ये टाकलेली माती, वाहनांची संख्या अधिक असल्याने आठवडाभरही राहत नाही. मातीमुळे मार्गावर प्रचंड धुळीचे लोट उठतात. यामुळे अनेकदा समोरील वाहनही दिसत नाही. हा रस्ता मिरजगाव, माहिजळगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी येथे लोकवस्तीतून जातो. त्यामुळे येथील व्यावसायिक, रहिवासी, पादचारी यांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.हा रस्ता निमगाव डाकूपर्यंत पूर्णत: खराब झाला आहे. तातडीने या मार्गावर पूर्णपणे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे. मिरजगावपासून ते नगरपर्यंत यामार्गावर पावसाने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. जोतिबावाडी, कठिणदेव, आंबिलवाडी, शिराढोण या परिसरात साईडपट्ट्या दोन फुटाहून खोल गेल्या आहेत. काही ठिकाणी डांबरीकरणाचे अस्तरच शिल्लक राहिलेले नाही. मिरजगाव, घोगरगाव, रूईछत्तीसी, शिराढोण, माहिजळगाव, रेल्वे क्रॉसिंग येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. महामार्ग प्राधिकरणाकडे हा राज्यमार्ग हस्तांतरित होणार आहे हे कारण पुढे करून गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग हा मार्ग दुरूस्त करण्यास टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायतीने मिरजगावमधील बावडकरपट्टी ते उकरी नदीपर्यंचा रस्ता तातडीने दुरूस्त करण्यासंदर्भात पत्र दिले. येत्या आठ ते दिवसात हा रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे यांनी सांगितले. मिरजगावसह जास्त अंतर असलेला खराब रस्ता दुरूस्त होण्यासाठी दहा दिवसाचा अवधी लागेल. आठ दिवसात नगर ते माहिजळगावपर्यंतचे खड्डे बुजवून होतील, असे अहमदनगर जागतिक बँक प्रकल्पाचे शाखा अभियंता रामराव वाघ यांनी सांगितले.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSolapurसोलापूर