नगर मनपा निवडणूक २०१८ : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:33 IST2018-11-15T13:33:38+5:302018-11-15T13:33:43+5:30
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. राज्यसभेचे सदस्य तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई ...

नगर मनपा निवडणूक २०१८ : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. राज्यसभेचे सदस्य तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे शिवसेनेचा प्रचारसभा घेणार आहेत.
शिवसेनेचे जाहीर केलेली स्टार प्रचारकांची यादी अशी- रामदास कदम, संजय राऊत, गजाजन किर्तीकर, आनंदराव आडसूळ, एकनाथ शिंदे, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतरे, गुलाबराव पाटील, अनिल देसाई, आदेश बांदेकर, अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर, निलमताई गोºहे, नितीन बानगुडे पाटील, भाऊ कोरगावकर,शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी नगरमध्ये सभा घेतली. त्यावेळी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा तिन्ही ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार अशी घोषणा केली होती. त्याची सुरवात महापालिका निवडणुकीपासून सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चांगली फौज नगरला पाठविणार आहेत. मंत्री, शिवसेनेचे नेते, प्रवक्ते हे नगरचे मैदान गाजविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.