नगरमध्ये मुरमु-याने भरलेल्या कंटेनरने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:55 IST2018-01-05T10:54:40+5:302018-01-05T10:55:57+5:30
अहमदाबादकडून बारामतीच्या दिशेने जाणा-या कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भरधाव वेगातच या कंटेनरने पेट घेतल्याची घटना नगरमधील स्टेट बँक चौकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

नगरमध्ये मुरमु-याने भरलेल्या कंटेनरने घेतला पेट
भिंगार : अहमदाबादकडून बारामतीच्या दिशेने जाणा-या कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भरधाव वेगातच या कंटेनरने पेट घेतल्याची घटना नगरमधील स्टेट बँक चौकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मुरमु-याने भरलेला कंटेनर (एम. एच. 42, एक्यू- 0406) हा शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नगरमधील स्टेट बँक चौकात पोहोचला असता इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे अचानक कंटेनरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखीत कंटेनर रस्त्याच्या कडेला घेत थांबविला. कंटेनरमध्ये असलेल्या मुरमु-याच्या पोत्यांनीही पेट घेतला. घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील मुरमु-याची आग विझत नव्हती. दोन तासानंतर आग आटोक्यात आली. तरीही कंटेनरमधील मुरमु-यांमधून धुराचे लोट बाहेर येत होते.