नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा मुश्रीफ यांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 09:14 IST2021-10-23T09:13:47+5:302021-10-23T09:14:22+5:30

दोन जिल्ह्यांचे काम एक माणूस कसा करू शकेल, असा प्रश्न उपस्थित करत हसन मुश्रीफ यांनी नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा पुनरुच्चार केला.

Mushrif reiterates to step down as Guardian Minister of ahmednagar | नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा मुश्रीफ यांचा पुनरुच्चार

नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा मुश्रीफ यांचा पुनरुच्चार

संगमनेर (जि. अहमदनगर) : कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर महानगरपालिका, नऊ नगरपालिकांसह इतर निवडणुका आहेत. त्यामुळे दोन जिल्ह्यांचे काम एक माणूस कसा करू शकेल, असा प्रश्न उपस्थित करत हसन मुश्रीफ यांनी नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याचा पुनरुच्चार केला.

पालकमंत्री मुश्रीफ हे शुक्रवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याच्या मनस्थितीत असून तशी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली आहे’, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना प्रश्न विचारला.

अजून मला पालकमंत्रिपदावरून काढले नाही. अजूनही पालकमंत्री मीच आहे. भाजपकडून आपल्याला लक्ष्य केले जात असले तरी त्यात काही फारसे तथ्य नाही. किरीट सोमय्या यांच्या विरोधात दोन दावे केल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Web Title: Mushrif reiterates to step down as Guardian Minister of ahmednagar