शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने ...

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने या मुरुमाचा चिखल होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड हा मार्ग जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून परिचित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे बीओटी तत्त्वावर काम झाले होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली. विशेषतः कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अनेकांना रस्त्यावर अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. न्यायालयाच्या आदेशाने मार्गावरील टोल वसुलीही बंद करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही रस्त्याचे भाग्य उजळले नाही.

..............

दहा कोटींचा निधी गेला कुठे

कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दहा कोटींचा निधीही दिला होता. जागतिक बँक प्रकल्प विभागाने दुरुस्तीसाठी चार कंत्राटदार नेमून या रस्त्याची दुरुस्ती केली. पण एवढा मोठा निधी मिळूनही रस्त्याची अवस्था फारशी सुधारलेली कुठेच दिसली नाही. या रस्त्यावरील अनेक लहान- मोठे खड्डे तसेच कायम आहेत तर काही ठिकाणी केवळ जुजबी दुरुस्ती केली गेली. मागील महिन्यात आठवडाभर झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्याचे खरे रूप उघडे पडले. त्यामुळे दहा कोटी कुठे गेले असा सवाल उपस्थित झाला.

.............................

चिखलामुळे अपघात

सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी पाणी साचून गटारे झाली आहेत. या रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. रिमझिम पावसामुळे या मुरूमाचा चिखल होऊन अपघाताची संख्या वाढली आहे.

..........

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प बँकेच्या माध्यमातून या रस्त्याच्या डागडुजी दरम्यान अनेक ठिकाणी दुरुस्ती केली. काही ठिकाणी साईड गटारांचे, साईडपट्ट्यांचे काम केले गेले. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.

-रवींद्र चौधरी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगांव

..............

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटींचा निधी दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक प्रकल्पाच्या अंतर्गत केवळ तात्पुरती मलमपट्टी केली गेली. आता रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले जात आहेत. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग झालेला नसून ठरावीक कंत्राटदारांचे चोचले पुरविल्या गेल्याने हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनत आहे.

-राजेद्र निर्मळ, राहाता तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.

270721\2440img-20210727-wa0146.jpg

नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी चक्क मुरूमाने...अपघातांचा धोका वाढला.दोन महिन्यापुर्वी खर्च केलेले दहा कोटी गेले पाण्यात