दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:59 IST2020-11-04T11:57:36+5:302020-11-04T11:59:05+5:30

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ही घटना घडली. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

Murder of wife for not paying for alcohol | दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

राहुरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ही घटना घडली. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

राहुरी तालुक्यामधील वांबोरी परिसरातील कुक्कडवेढे येथे गंगाबाई बद्रीनाथ चव्हाण (वय ४२) ही महिला पाच ते सहा दिवसांपासून पती बद्रीनाथ चव्हाण आणि त्यांचा मुलगा ऊसतोडणीसाठी कुक्कडवेढे येथे आले होते. ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी आहेत. ऊस तोडणीसाठी ते कुक्कडवेढे येथे आले होते.

या घटनेमधील आरोपी बद्रीनाथ चव्हाण हा व्यसनाधीन होता. दोन नोव्हेंबर रोजी बद्रीनाथ चव्हाण याने गंगाबाईकडे पैशाची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे दिले नाही. या गोष्टीचा राग आल्याने दोघांमध्ये भांडणे झाली. बद्रीनाथ चव्हाण याने डोक्यात दगड मारून गंगाबाईचा खून केला.

श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, आयपीएस अधिकारी नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, नीरज बोकील, हवालदार अजिनाथ पाखरे, प्रभाकर शिरसाट, संतोष राठोड, रवींद्र मेढे, सुनील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनाम केला. आरोपी बद्रीनाथ चव्हाण याला अटक केली आहे. फिर्यादी मृत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Web Title: Murder of wife for not paying for alcohol