डोक्यात दगड घालून एक महिन्याच्या मुलाची हत्या;  मातेलाही पाजले विष; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:49 IST2020-05-15T10:48:33+5:302020-05-15T10:49:02+5:30

पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे बुधवारी (दि.१३) रात्री एक महिन्याच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी मयत बाळाच्या आईलाही विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Murder of a one-month-old boy by throwing a stone at his head; Poisoned mother too; Both arrested | डोक्यात दगड घालून एक महिन्याच्या मुलाची हत्या;  मातेलाही पाजले विष; दोघांना अटक

डोक्यात दगड घालून एक महिन्याच्या मुलाची हत्या;  मातेलाही पाजले विष; दोघांना अटक

सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे बुधवारी (दि.१३) रात्री एक महिन्याच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी मयत बाळाच्या आईलाही विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुपा पोलिसांनी दोघांना अटक केली.
अर्णव अभिषेक चव्हाण (वय एक महिना), असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत उज्ज्वला अभिषेक चव्हाण (वय १९, रा. वाघुंडे बु.) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात आदिक अजगण काळे, समीर आदिक काळे, किशोर मंत्री चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास वाघुंडे बुद्रूकशिवारातील उज्ज्वला चव्हाण यांच्या घरी हे आदिक काळे व समीर काळे आले होते. त्यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने महिलेच्या तोंडात विषारी औषध टाकले. यावेळी आरोपींनी अर्णव चव्हाण या एक महिन्याच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आदिक काळे, समीर काळे यांना अटक केली आहे. किशोर चव्हाण फरार आहे. उज्ज्वला चव्हाणवर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही़

Web Title:  Murder of a one-month-old boy by throwing a stone at his head; Poisoned mother too; Both arrested