शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

नगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST

अहमदनगर : लॉकडाऊन सुरू असताना सर्व नियम धाब्यावर बसवत एका निवासस्थानी व चक्क दालनातसुद्धा वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याने अडचणीत ...

अहमदनगर : लॉकडाऊन सुरू असताना सर्व नियम धाब्यावर बसवत एका निवासस्थानी व चक्क दालनातसुद्धा वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याने अडचणीत आलेले महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मनपा आयुक्तांनी अखेर सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. कोविड रुग्णालयांना परवानगी देताना नियमांचे पालन केले नाही यासह १७ प्रकारचे गंभीर ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी असताना डाॅ. बोरगे हे अनेक बाबीत अपयशी ठरले, असे आयुक्त शंकर गोरे यांनी आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची गर्दी जमवून आपल्या दालनात व निवासस्थानी बोरगे गाणे गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी समाजातून संताप व्यक्त झाला. बोरगे यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. परंतु, त्यांनी मुदतीत खुलासा केला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही बोरगे यांच्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत्या. त्यांनी बोरगे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश मनपा आयुक्तांना दिला असल्याचे समजते. आयुक्तांनी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल मागविला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बोरगे हे यापूर्वीही अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आहेत. ते निलंबितही झाले होते. मध्यंतरी एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाने केलेल्या तक्रारीमुळेही ते वादग्रस्त ठरले. त्यांच्या दालनात रेमडेसिविर इंजेक्शन सापडल्याप्रकरणीही पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

.....

बोरगे यांच्या कामकाजाबाबत आयुक्तांनी दाखविलेल्या त्रुटी

- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लशींचे वाटप न करता कर्मचाऱ्यांकडून परस्पर वाटप करणे

- बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यावर नियंत्रण न ठेवणे

- शासनाच्या निर्देशानुसार मृत पावलेल्या रुग्णांचे ऑडिट केले नाही

- शासनाच्या पोर्टलवर मुदतीत माहिती न भरणे

- दालनात सोशल डिस्टन्सिंग न ठेवता गाणे म्हणून महापालिकेची प्रतिमा मलीन करणे

- स्वत:चे मालमत्ता प्रमाणपत्र २०१३- १४ पासून सादर केलेले नाही

- कोविडबाबतचे दैनंदिन अहवाल वेळेत सादर न करणे

- कोरोनात प्रतिबंधक क्षेत्र तयार करण्याबाबत वेळेत माहिती सादर न करणे

- शहरातील रुग्णालयांनी वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मोकळ्या व्हायल ताब्यात घेऊन त्यांची दैनंदिन माहिती सादर केली नाही

- कोविड रुग्णालयांना परवानगी देताना शासकीय निकषांचे पालन केले नाही

- माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा अहवाल सादर न करणे

...............

जिल्हा शल्य चिकित्सकांबाबतही आक्षेप

नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यावरही कारवाई करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठविला आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या व्हिडीओ काॅन्फरन्स बैठकीलाच अनुपस्थिती दर्शवली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतरही डॉ. पोखरणा पदावर कायम आहेत. महापालिकेतही वैद्यकीय अधिकारी सक्षम नसल्याचे बोरगे यांच्यावरील कारवाईमुळे समोर आले.