मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार १० हजारांचे सानुग्रह अनुदान

By अरुण वाघमोडे | Updated: October 27, 2023 18:20 IST2023-10-27T17:46:43+5:302023-10-27T18:20:45+5:30

मनपात शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय

Municipal employees have a sweet Diwali, they will get a grant of 10,000 | मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार १० हजारांचे सानुग्रह अनुदान

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार १० हजारांचे सानुग्रह अनुदान

अरुण वाघमोडे, अहमदनगर: महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व पगारापोटी साडेबारा हजार रुपयांचा ॲडव्हान्स मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शुक्रवारी (दि.२७) मनपात महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस अनंत वायकर, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक शाम नळकांडे, विजय पठारे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे, मुख्यलेखाधिकारी सचिन धस, उपायुक्त श्रीनिवास कुरे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेंडगे म्हणाल्या कामगार युनियनने दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व थकीत देणे देण्याबाबत मागणी केली होती. याबाबत कामगार युनियन पदाधिकारी, प्रशासन व पदाधिकारी यांची बैठक घेवून बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वानुमते चांगला निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी ॲडव्हन्स देखील मिळणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी मिळावी, याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशसनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Municipal employees have a sweet Diwali, they will get a grant of 10,000