बहुरंगी लढत सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर
By Admin | Updated: June 19, 2014 00:10 IST2014-06-18T23:39:21+5:302014-06-19T00:10:31+5:30
हेमंत आवारी, अकोले केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महायुतीत ‘फिलगुड’ असले तरी अकोले विधानसभेसाठी एकास एक लढत न झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता धुसरच मानली जाते.

बहुरंगी लढत सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर
हेमंत आवारी, अकोले
केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महायुतीत ‘फिलगुड’ असले तरी अकोले विधानसभेसाठी एकास एक लढत न झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता धुसरच मानली जाते. २५ हजार तरुण मतदार कोणता परिणाम घडवितात, याकडे मात्र मतदारसंघाचे लक्ष असेल.
विधानसभेच्या गेल्या सात निवडणुकांत बहुरंगी लढतीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्या की साडेचार वर्षे एकास एक लढतीची चर्चा होते, मात्र मतदारसंघात प्रत्यक्षात बहुरंगी लढत पहावयास मिळते.
आदिवासींची रोजगारासाठी भटकंती, पाणी टंचाई, बेरोजगारी, एमआयडीसीची मागणी, भ्रष्टाचार, निळवंडे धरणाचे कालवे, उंचावरील कालवे, डोंगर माथ्यावरील पवनऊर्जा प्रकल्प, सिंचनाचे पाणी ही विरोधकांची ‘अस्त्रे’ दरवेळी निष्प्रभ ठरत आली आहेत.
१९८० पासून मधुकरराव पिचड यांनी सलग सात वेळा जिंंकण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपदही मिळाले. या निवडणुकीत ते उमेदवारी करतात की युवा नेतृत्वाला संधी देतात, यावर आतापासूनच राजकीय खलबते सुरु आहेत.
अशोक भांगरे यांनी पाच वेळा वेगवेगळा झेंडा घेऊन पिचडांना टक्कर दिली. सेनेचे मधुकर तळपाडे राजपत्रित अधिकाऱ्याची नोकरी व दिव्याची गाडी सोडून राजकारणात उतरले. परंतु तेही अपयशीच ठरले आहेत. माकपने कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत तालुक्यात चळवळ जीवंत ठेवली आहे. त्यांचा उमेदवार असल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढते.
लोकसभेतील मोदी फॅक्टरमुळे महायुतीचे मनोबल वाढले असले तरी आता उमेदवारीवरून त्यांच्यातच रस्सीखेच सुरू झाली आहे. १९९९ च्या निवडणुकीनंतर या भागात निवडणूक पत्रिकेवर ‘पंजा’ दिसला नाही. ठाकर समाजाची मते व पठारावरील धनगर समाजाची मते निवडणुकीत परिणामकारक ठरतात.
मोदी लाट, महायुतीत उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीतील जुन्या नव्याचा वाद, काँग्रेसच्या दोन गटांचे मनोमिलन, शिव-भिमसैनिक महायुतीची तरुणाई, बोगस आदिवासींचा मुद्दा, आदिवासी-धनगर संभाव्य संघर्ष, आदिवासी क्रांतीदल या सर्व आघाड्यांसह होणाऱ्या तिरंगी-चौरंगी लढती कोणाच्या पथ्यावर पडतात, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीकडून मंत्री पिचड, वैभव पिचड, महायुतीचे मधुकर तळपाडे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे आदींसह माकप, भाकप, बसपा, आप अशी इच्छुकांची लांबलचक यादी आहे.
राष्ट्रवादीमधुकर पिचड ६००४३
शिवसेनामधुकर तळपाडे ५०९६४
अपक्षअशोक भंगारे १७०१६
इच्छुकांचे नावपक्ष
मधुकर पिचड राष्ट्रवादी
मधुकर तळपाडे शिवसेना
अशोक भांगरे काँग्रेस
लोकसभा निवडणुकीत
सदाशिव लोखंडे यांना ४५०० चे मताधिक्य