श्रीगोंद्याचा स्वप्नील गुंड ठरला एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:56 IST2020-02-05T15:55:14+5:302020-02-05T15:56:35+5:30
पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावला.

श्रीगोंद्याचा स्वप्नील गुंड ठरला एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी
श्रीगोंदा : पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावला. अक्षयकुमार शिंदे हा ८६ किल्लो वजन गटात उपविजेता ठरला.
९७ किल्लो वजन गटात स्वप्निल गुंड व बिपीन काळे यांच्यात अंतिम सामना रंगला. स्वप्नील गुंड याने कुस्ती चितपट करीत एमएसबीटी केसरी किताबावर आपली विजयी मोहर उमटवली. तर ८६ किल्लो वजन गटात अक्षयकुमार शिंदे व उमेश कांबळे यांच्यात अंतिम लढत झाली. अक्षय शिंदे उपविजेता ठरला. श्रीगोंदा शहरातून स्वप्नील गुंड याची मंगळवारी भव्य मिरवणूक काढली होती. स्वप्नील गुंड याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रशांत दरेकर, समीर बोरा, स्मितल वाबळे यांनी सत्कार केला. यावेळी संस्थेचे निरीक्षक एस. पी. गोलांडे प्राचार्य अमोल नागवडे, क्रीडा प्रतिनिधी प्रा.महेंद्र पाचपुते, कानिफनाथ उगले, प्रमोद म्हस्के उपस्थित होते.