तीन कुख्यात गुंडांवर एमपीडीएतंर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:02 IST2019-10-06T17:59:58+5:302019-10-06T18:02:45+5:30
जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा कुख्यात गुंडांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली आहे़ कारवाईचा आदेश निघताच पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़

तीन कुख्यात गुंडांवर एमपीडीएतंर्गत कारवाई
अहमदनगर : जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा कुख्यात गुंडांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली आहे़ कारवाईचा आदेश निघताच पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़
प्रवीण उर्फ दीपक बबन लाटे (वय ३० रा़ चिंचोली ता़ राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय २९ रा़ कुंभारी, ताक़ोपरगाव) व अरुण बाबासाहेब घुगे (वय २२, राक़ेडगाव, नगर) या तिघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे़ वाळूतस्करी, अवैध व्यवसाय व हाणामारीच्या घटनेत या तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत़ प्रवीण लाटे याच्याविरोधात राहुरी, भारती याच्याविरोधात कोपरगाव तर घुगे याच्याविरोधात कोतवाली व नगर तालुक्यात गुन्हे दाखल आहेत़ या तिघांवर एमपीडीएतंर्गत कारवाईचा स्थानिक पोलिसांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते़
कारवाईला मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दीपाली काळे, सोमनाथ वाकचौरे, उपाधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अनिल कटके, काशिनाथ देशमुख, शंकरसिंग राजपूत, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉस्टेबल संदीप घोडके, मोहजन गाजरे, मनोज गोसावी, बाळासाहेब मुळिक, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, राहुल सोळुंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किरण जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली़