मंदिरे उघडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:55 IST2020-08-29T14:55:07+5:302020-08-29T14:55:53+5:30
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा..दार उघड...अशा घोषणा देत टाळ, मृदुंगाचा गजर करीत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले.

मंदिरे उघडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे आंदोलन
सोनई : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा..दार उघड...अशा घोषणा देत टाळ, मृदुंगाचा गजर करीत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले.
आघाडी सरकारचा मंदिर बंदचा निर्णय हा भाविकांच्या दृष्टीने अन्यायकारक असून आता सरकारने मंदिराची दारे उघडावीत, अश्ी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे, भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, भिकचंद मुठे, बंडूभाऊ चंदेल, सुभाष पवार, भिकचंद मुठे, प्रतापराजे चिंधे, शिवप्रसाद महाराज, अभिषेक महाराज जाधव, अंबादास उंदरे, बाळासाहेब कु-हाट, कैलास दहातोंडे, नवनाथ गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.