प्रारंभी पोलिसांनी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून एका व्हॅनचा शोध घेतला. व्हॅनमधून एका व्यक्तीचा आरडाओरडा ऐकल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, पोलिसांनी बेलापूर व श्रीरामपूर शहरातील सीसीटीव्ही चित्रण पाहिले. त्यात ती व्हॅन सापडली. मात्र, संबंधित व्यक्तीच्या चौकशीनंतर त्यात तथ्य नसल्याचे समोर आले. या दरम्यान पोलिसांचा महत्त्वपूर्ण वेळ वाया गेला. त्यामुळे तपासाची दिशा भरकटली.
या घटनेमुळे पोलिसांना आता नव्याने अपहरणाचा तपास हाती घ्यावा लागला आहे. आता संशयाचे प्रत्येक कंगोरे पोलीस तपासत आहेत. काही जणांची त्यातून चौकशी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपहरणामागील कारणाचा पोलिसांना उलगडा झालेला नाही. त्यामुळे स्वत:च सर्व शक्यता तपासून पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शोधकार्य लांबले आहे.
दरम्यान, आज शनिवारी बेलापूर ग्रामस्थांनी घटनेच्या विरोधात बंद पुकारला आहे. सोमवारपर्यंत हिरण यांचा शोध लागला नाही, तर त्यानंतर गाव बेमुदत बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
-----------