आई, वडिलांच्या साक्षीने घरातच विवाहबद्ध; व-हाडी मंडळींनी टाकल्या आॅनलाईन अक्षदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:20 IST2020-04-27T18:19:05+5:302020-04-27T18:20:05+5:30
एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार विद्यार्थ्यांची दोन टाईमाची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.

आई, वडिलांच्या साक्षीने घरातच विवाहबद्ध; व-हाडी मंडळींनी टाकल्या आॅनलाईन अक्षदा
बाळासाहेब काकडे/
श्रीगोंदा : एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार विद्यार्थ्यांची दोन टाईमाची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.
या आगळ्या वेगळ्या विवाहाचे फेसबुक यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. व-हाडी मंडळींनी या लाडक्या जोडीवर घरात बसून आॅनलाईन अक्षदा टाकल्या. हा विवाह सोमवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथे पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील वसंतराव निंभोरे यांचे चिरंजीव किरण तर येळपणे येथील वाल्मिक डफळ यांची कन्या राणी यांचा सहा महिन्यापूर्वी विवाह निश्चित झाला होता. २७ एप्रिल २०२० हा विवाहाचा मुहूर्त काढण्यात आला होता. किरण हा एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. तर राणी ही मनमाड येथे पीएसआय आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे झाली अडचण
मात्र वधू-वरांनी फक्त आई, वडिलांच्या उपस्थितीत सोशल डिस्टसिंगचे व नियमाचे तंतोतंत पालन केले. परिसर सॅनेटाईज करण्यात आला होता. यावेळी सुमारे १ हजार ५०० चाहत्यांनी आपआपल्या घरी बसून या जोडीला आॅनलाईन शुभेच्छा दिल्या.
विवाह करा पण..
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रत्येकांने संचारबंदीचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र कोणताही डामडौल न करता आपल्या घरातच विवाहबद्ध होऊ शकता.आम्ही लग्नाचा वाचलेला भोजन खर्च पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांच्या भोजनावर करणार आहे.
-किरण निंभोरे, राणी डफळ, वधू-वर.