लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : नाताळची सुटी, तसेच साईदर्शनाने सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत साईभक्तांचा जनसागर लोटला होता. २५ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.
या कालावधीत साईचरणी भाविकांनी तब्बल २३ कोटी २९ लाख रुपयांचे दान अर्पण केले. या बाबतची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकारांना दिली.
८० लाखांचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण
भक्तांनी रोख रकमेसह सोने, चांदी व ऑनलाइन माध्यमातून भरभरून दान दिले. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका भक्ताने ८० लाख रुपये किमतीचा हिरेजडीत सुवर्ण मुकुट बाबांना अर्पण केला.
दर्शनासोबतच भक्तांनी प्रसादाचाही मोठा लाभ घेतला. संस्थानच्या वतीने ७ लाख ६७ हजार ४४४ लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली, ज्यातून संस्थानला दोन कोटी ३० लाख २३ हजार रुपये प्राप्त झाले.
असे मिळाले दान
| देणगीचा प्रकार | प्रमाण / वजन | अंदाजित रक्कम (रुपये) |
| दानपेटी (कॅश) | - | ६,०२,६१,००० |
| देणगी काउंटर | - | ३,२२,४३,००० |
| पी.आर.ओ. (PRO) | - | २,४२,६०,००० |
| ऑनलाइन, चेक इ. | - | १०,१८,८६,००० |
| परकीय चलन (२६ देश) | - | १६,८३,००० |
| सोने | २९३.९१० ग्रॅम | ३६,३८,००० |
| चांदी | ५ किलो ९८३ ग्रॅम | ९,४९,००० |
Web Summary : Over 8 lakh devotees visited Shirdi in eight days, donating ₹23.29 crore. A devotee offered a ₹80 lakh gold crown. 7.67 lakh ladoo packets were sold, earning ₹2.30 crore.
Web Summary : शिर्डी में आठ दिनों में 8 लाख से अधिक भक्तों ने दर्शन किए, ₹23.29 करोड़ का दान दिया। एक भक्त ने ₹80 लाख का सोने का मुकुट भेंट किया। 7.67 लाख लड्डू पैकेट बिके, जिससे ₹2.30 करोड़ की कमाई हुई।