राज्यभरातील साधू संत वृध्देश्वरला
By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:14:13+5:302014-07-28T00:51:23+5:30
करंजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे श्रावण महिना सुरू होताच भाविकांची गर्दी वाढली आहे.
राज्यभरातील साधू संत वृध्देश्वरला
करंजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे श्रावण महिना सुरू होताच भाविकांची गर्दी वाढली आहे.
श्रावण महिन्यामध्ये वृद्धेश्वर येथे महिनाभरासाठी राज्यभरातून अनेक साधू-संत, भक्तगण अनुष्ठानासाठी येतात. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी देवस्थान समितीने संपूर्ण नियोजन केले आहे. श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी बेलआरतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याचबरोबर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा उत्सव आयोजित केला जातो. बुधवार, दि. २७ आॅगस्ट रोजी या ठिकाणी वृद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीला शित लावण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे.
या निमित्ताने पंचामृतासह फुलांनी स्वयंभू पिंडीची सजावट केली जाते. शित लेपाच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येथे एकत्र येतात. श्रावण महिन्यात भाविक राज्यभरातून प्रत्येक सोमवारी आवर्जून हजेरी लावतात.
श्रावण महिन्यात अभिषेक महापूजा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासाठी देवस्थान समितीने स्वतंत्रपणे महापूजा अभिषेकाची व्यवस्था केली आहे. या संपूर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविक ांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी केले आहे. (वार्ताहर)