शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द करणे, घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक ...

बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द करणे, घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, रेल्वे, कोळसा व अन्य खनिज उद्योग भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचे मोठे षडयंत्र या सरकारने यशस्वी केले. सरकारच्या भांडवलदारधार्जीण्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीने संघर्ष करून मिळवलेले हक्क आणि कायदे बहुमताच्या जोरावर संघटनांशी आणि संसदेत चर्चा न करता नष्ट करण्यात आले आहेत.

शेतकरी संघटनांनी मागणी केलेली नसताना, या संघटनांचा विरोध असताना गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात घाईने तीन काळे कृषी कायदे घाईने मंजूर केले. या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास २६ मे ला सहा महिने पूर्ण होत आहेत. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकरी हटले नाहीत. कोरोनाकाळात जनता उपचार, औषधे आणि ऑक्सिजनअभावी मृत्यूचा सामना करत असताना मोदी, शहा निवडणूक प्रचारात दंग होते. सेंट्रल विस्टा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. देश संकटात असताना पक्षीय राजकारण आणि द्वेषाचे राजकारण करण्यात सरकार दंग आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने देशभर ‘मोदी सरकार निषेध दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात संगमनेर तालुका किसान संघर्ष समिती सहभागी होणार आहे, असे संयोजक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या घरावर, कार्यालयावर काळा झेंडा फडकावून मोदी सरकार निषेध दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.