कर्नाटकातील बंडखोर आमदार साईदरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:28 IST2019-07-13T13:18:46+5:302019-07-13T13:28:26+5:30

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदार साईदर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.

MLA in Karnataka in shirdi | कर्नाटकातील बंडखोर आमदार साईदरबारी

कर्नाटकातील बंडखोर आमदार साईदरबारी

 शिर्डी : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदार साईदर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. 
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चार्टर विमानाने त्यांचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. खासगी बसने  आमदारांना घेऊन शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी या बंडखोर आमदारांचे विमानतळावर स्वागत केले. युवक कॉग्रेसच्या वतीने या आमदारांना  काँग्रेस पक्षाचे झेंडे दाखविण्यात आले. 
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तर भाजपचा निषेध नोंदविला. 

Web Title: MLA in Karnataka in shirdi