‘ईडी’ची चौकशी लावण्यामागे देवेंद्र फडणवीस - हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:06 IST2021-02-17T05:06:00+5:302021-02-17T05:06:27+5:30

Hasan Mushrif : मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या विरोधात भूमिका मांडली की, ‘ईडी’कडून चौकशी लावली जात आहे. असे राजकारण याआधी कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे.

Minster Hasan Mushrif criticized devendra fadnavis on ED | ‘ईडी’ची चौकशी लावण्यामागे देवेंद्र फडणवीस - हसन मुश्रीफ

‘ईडी’ची चौकशी लावण्यामागे देवेंद्र फडणवीस - हसन मुश्रीफ

अहमदनगर : भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या पाठीमागे ‘ईडी’च्या चौकशी लावल्या जात असून, यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप करत आता ईडी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत राज्य सरकार कायदा करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या विरोधात भूमिका मांडली की, ‘ईडी’कडून चौकशी लावली जात आहे. असे राजकारण याआधी कधीही झाले नव्हते. विरोधातील आवाज दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे. हे सर्व फडणवीस हेच करत आहेत. याबाबत आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कायदा आणणार आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबाबत मुश्रीफ म्हणाले, केवळ संशय आणि आरोपावरून एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे आहे. आता या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. रेखा जरे हत्याकांडाबाबत मुश्रीफ म्हणाले, या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. 

Web Title: Minster Hasan Mushrif criticized devendra fadnavis on ED