मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:09 IST2020-09-07T15:45:52+5:302020-09-07T17:09:14+5:30
राहुरी : राज्याचे उर्जा, नगरविकास व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसे त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहे.

मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह
राहुरी : राज्याचे उर्जा, नगरविकास व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसे त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहे.
मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून त्यापूर्वीच सरकारने मंत्रालयात अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार, त्यांचे सचिव व अन्य अधिकारी यांची विधानभवन आवारात कोरोना चाचणी करण्यात आली. राहुरीचे आमदार तथा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पावसाळी अधिवेशनासाठी मुंबई विधान भवनात गेले असून तिथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल दुपारी मिळाला असून त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मंत्री तनपुरे हे सतत दौºयात असून लोकांच्या संपर्कात आहेत. कितीही बचाव केला तरी कोरोना चाचणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वत: काळजी घेत आहे. आपणही काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच मी तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याचे तनपुरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.