आरक्षण जाहीर होताच सदस्य अज्ञातस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:00+5:302021-02-05T06:36:00+5:30

जामखेड : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येथील कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. आरक्षण ...

Members anonymously as soon as reservation is announced | आरक्षण जाहीर होताच सदस्य अज्ञातस्थळी

आरक्षण जाहीर होताच सदस्य अज्ञातस्थळी

जामखेड : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येथील कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होताच नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या खर्डा, साकत, नान्नज, पिंपरखेड, हळगाव, जवळा अशा काही ग्रापंचायतींमध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच आहे.

तीन वर्षांचा मुलगा अपूर्व अमोल निमोणकर याच्या हस्ते आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे आदी उपस्थित होते. ५८ पैकी ५ जागा अनुसूचित जाती व १ जागा अनुसूचित जमातीसाठी तर १६ जागा इतर मागासवर्गीयासाठी व उर्वरित ३६ ग्रामपंचायत या खुला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षणपुढील प्रमाणे - अनुसूचित जाती (महिला)- रत्नापूर, धनेगाव, हळगाव तर (व्यक्ती) जवळा व कवडगाव, अनुसूचित जमाती (व्यक्ती) गुरेवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- आघी, खुरदैठण, चोंडी, तरडगाव, नायगाव, बाळगव्हाण, मोहरी, मुंजेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती) -

पिंपळगाव उंडा, राजेवाडी, बांधखडक, आपटी, जवळके, धानोरा - वंजारवाडी,

पाटोदा, मोहा,

सर्वसाधारण खुला प्रवर्ग (स्त्री) -

आनंदवाडी, खर्डा, खांडवी, जातेगाव, जायभायवाडी, डोणगाव, तेलंगसी, दिघोळ, धामणगाव, धोंडपारगाव, नाहुली, पिंपळगाव आळवा, फक्राबाद, बोरले, राजुरी, शिऊर, साकत, सातेफळ, सर्वसाधारण खुला प्रवर्ग (व्यक्ती)

- अरणगाव, कुसडगाव, घोडेगाव, चोभेवाडी, झिक्री, देवदैठण, नान्नज, पाडळी, पिंपरखेड, पोतेवाडी, बावी, मतेवाडी, लोण, वाघा, सावरगाव, सोनेगाव, वाकी, सारोळा.

Web Title: Members anonymously as soon as reservation is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.