कुरकुंडीत अल्पवयीन मुलीचा विवाह; जळगावच्या व-हाडींवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:41 IST2020-07-04T18:38:08+5:302020-07-04T18:41:03+5:30

संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी साडेबारा वाजता १७ वर्षीय मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई, वडिल, भाऊ व मुलीचे आई, वडिल अशा पाच जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Marriage of a child girl in Kurkundi; Filed a case against Jalgaon husband | कुरकुंडीत अल्पवयीन मुलीचा विवाह; जळगावच्या व-हाडींवर गुन्हा दाखल

कुरकुंडीत अल्पवयीन मुलीचा विवाह; जळगावच्या व-हाडींवर गुन्हा दाखल

घारगाव : संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी साडेबारा वाजता १७ वर्षीय मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई, वडिल, भाऊ व मुलीचे आई, वडिल अशा पाच जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
अतुुल गुलाब सूर्यवंशी (नवरेदव), जितेंद्र गुलाब सूर्यवंशी (भाऊ), गुलाब रामदास सुर्यवंशी (वडील) यांच्यासह मुलीचे आई, वडील अशा पाच जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाद्रा येथील रहिवासी आहेत.
कुरंकुडी येथील ग्रामसेवक संदेश भाऊसाहेब यादव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. 

Web Title: Marriage of a child girl in Kurkundi; Filed a case against Jalgaon husband