हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:09+5:302021-09-05T04:25:09+5:30
संगमनेर : लग्नात काही दिले नसल्याने ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, असे म्हणत सासरकडील मंडळींनी विवाहितेच्या गळ्यातील ...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
संगमनेर : लग्नात काही दिले नसल्याने ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, असे म्हणत सासरकडील मंडळींनी विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नेकलेस काढून घेत तिला शिवीगाळ करत घराबाहेर काढून दिले. हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह, सासू, सासऱ्याविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन रामकृष्ण लांडे (पती), रामकृष्ण हरिभाऊ लांडे (सासरा), सत्यभामा रामकृष्ण लांडे (सासू) (सर्व रा. वाघापूर, ता. अकोले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० ऑगस्ट २०२० विवाह झाल्यानंतर पती गजानन लांडे हा नीट बोलत नव्हता. तसेच अकोले तालुक्यातील एका महिलेशी त्याचे संबंध असल्याचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात आले. याबाबत सासू, सासरा यांना सांगितले असता ते पतीला काहीही बोलले नाही. त्यानंतर पती मलाच शिवीगाळ, दमदाटी करू लागला. लग्नात आई, वडिलांनी काही दिले नसल्याने ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत. वडिलांकडे देण्यासाठी पैसे नसल्याने पती, सासू, सासरा यांनी माझा मानसिक, शारीरिक छळ सुरू करत घराबाहेर काढून दिल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहेत.