शिर्डीमध्ये मराठा समाजाची निदर्शनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:57 IST2018-07-24T12:56:49+5:302018-07-24T12:57:15+5:30

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजातफे शिर्डी शहरात अहमदनगर-मनमाड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.

Maratha society demonstration in Shirdi | शिर्डीमध्ये मराठा समाजाची निदर्शनं

शिर्डीमध्ये मराठा समाजाची निदर्शनं

शिर्डी : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजातफे शिर्डी शहरात अहमदनगर-मनमाड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नगर-मनमाड मार्ग काही वेळ ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक रेंगाळली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही तरूणांनी सकाळपासून सुरू असलेली काही दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या पाणी टाकीवर चढून फडकविला भगवा ध्वज फडकवण्यात आला.

 

Web Title: Maratha society demonstration in Shirdi