शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी महाविकास आघाडी लाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

अहमदनगर: राज्यासमोर असलेल्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार ...

अहमदनगर: राज्यासमोर असलेल्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे नाटक करत असून, सत्तेसाठी लचार असलेले हे सरकार आहे, अशी घाणाघाती टीका भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी नगर येथे पत्रकार परिषदेत केली.

विखे म्हणाले, राज्यात शेतकरी, कोरोनाची महामारी, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडविता अंतर्गत मतभेद असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी ते तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांना करायची नाही. काहींना पैसे कमवायचे आहेत, ते पैसे कमविण्याच्या मागे लागलेले आहेत. काहीजण भांडत आहेत. सरकारमध्ये मतभेद आहेत. लाचारीसाठी हे पक्ष एकत्र आल्याने त्यांची एकी एवढ्या सहजासहजी तुटणार नाही, असाही टोला विखे यांनी लगावला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात सहकाऱ्यांना संधी मिळालेली आहे. डॉ. प्रीतम मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. या नाराजीतून ते राजीनामे देत आहेत. परंतु, पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत, असे विखे म्हणाले.

...