कराटेत महाराष्ट्राला २५ सुवर्णपदक
By Admin | Updated: October 8, 2014 00:04 IST2014-10-07T23:37:25+5:302014-10-08T00:04:54+5:30
अहमदनगर : दादा चौधरी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने २५ सुवर्णपदक मिळवून उपविजेतेपद मिळविले़

कराटेत महाराष्ट्राला २५ सुवर्णपदक
अहमदनगर : दादा चौधरी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने २५ सुवर्णपदक मिळवून उपविजेतेपद मिळविले़ एसकेएफआय यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ नगर शहरात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत आसाम, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील एकूण ४०० स्पर्धक सहभागी झाले होते़ राज्यातील विविध जिल्ह्यातील ६० स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते़ या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला २५ सुवर्ण, १२ रजत तर १५ कांस्य पदक मिळाले़ स्पर्धेत महाराष्ट्र संघ दुसऱ्या स्थानावर राहिला़ उद्योजक अजित बोरा, संपत बोरा यांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले़ पंच म्हणून विजय टकले, हर्षल पाचपुते, पुनम पिंपरकर व वैशाली बांगर यांनी काम पाहिले़ पारितोषिक वितरणप्रसंगी अभय जामगावकर, विठ्ठल ढगे अखील भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष महेश कुशवाह, चंद्रकांत राहिंज आदी उपस्थित होते़