महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात; काेल्हापूर, सोलपूरच्या मल्लांनी गाजविले मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 23:31 IST2025-01-29T23:29:54+5:302025-01-29T23:31:05+5:30
वाडिपार्क मैदानावर रंगला थरार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात; काेल्हापूर, सोलपूरच्या मल्लांनी गाजविले मैदान
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बुधवारी कोल्हापूर, सोलापूरच्या तालमीतील मल्लांनी विजयी सलामी देत मैदान गाजविले. पहिल्या फेरीत ५७ व ८६ वजन गटातील विजेत्यांना आज गुरुवारी बक्षिस वितरण केले जाणार आहे.
पहिला दिवशी यांनी मारली बाजी
गादी विभाग ( ५७ किलो वजन गट )
मयुर चौधरी ( भंडारा ), अविराज माने ( सोलापूर ), अकाश गड्डे ( लातूर ), वैभव पाटील ( कोल्हापूर ), संकेत सातारकर ( अहिल्यानगर ), मिनाद बडरे ( सांगली ), तुषार जाधव ( यवतमाळ ), नवनाथ गगमाले ( रायगड ), परिमल राऊत ( चंद्रपूर ) गोरख कोळेकर (सातारा ) सुशांत चौधरी ( ठाणे ) , विनायक भोयर ( कल्याण )
गादी विभाग ( ८६ किलो )
संग्राम गिडगे (नाशिक ), अकाश घोडके (अहिल्यानगर ), शुभम दुधाळ (सोलापूर ), स्वप्निल काशिद (सोलापूर मुन्तजीर सरनोबत ( धाराशिव ), सौरव शिंगाडे (कल्याण), विजय म्हात्रे (कोल्हापूर), दर्शन चव्हाण (कोल्हापूर), संभाजी देवकर (संभाजीनगर ).
माती विभाग (५७ किलो वजन गट )
अमित साळवी (कोल्हापूर ) सौरव इगवे ( सोलापूर ), ओंकार निगडे ( पुणे ), अफरोज शेख ( संभाजीनगर ) , किशोर पवार ( सोलापूर ) , अकाश पगारे ( नाशिक ), सचिन मुरकुटे ( अहिल्यानगर ) दिग्विजय पाटील ( कोल्हापूर ), प्रतिक पाटील ( सांगली ), पारस बीडकर ( अहिल्यानगर ), ओम तापकीर ( पिंपरी चिंचवड )
माती विभाग ( ८६ किलो वजन गट )
सचिन तलमले ( नागपूर ), चंद्रशेखर गवळी ( धुळे ), दत्तात्रय खोत ( सांगली ), हर्षवर्धन पठाडे ( अहिल्यानगर ), नामदेव केसरे ( मुंबई ), प्रदीप काळे ( लातूर ), विशाल म्हस्के ( संभाजीनगर ), अभिजित शेंडे ( पुणे ), सुनील जाधव ( सोलापूर ).
येथील वाडिपार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्यभरातून ८६० मल्ल सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी दहा वाजता मल्ल मैदानावर दाखल झाले. मल्लांची वैद्यकीय चाचणी करून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. सायंकाळी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. गादी व माती विभागातील ५७ व ८६ वजन गटातील कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याच्या मल्लांनी बाजी मारली. या दोन्ही गटाच्या एकूण सहा फेऱ्या होणार असून, विजेत्यांना उद्या गुरुवारी बक्षिस वितरण केले जाणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पहिली फेरी उद्या गुरुवारी होणार आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय दर्जाचे पंच दाखल झाले असून, त्यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात येतो. मैदानाच्या बाजूला मोठ्या स्क्रिन बसविण्यात आलेल्या आहेत. त्यावर मल्लाचे व गाव आणि वजन, अशी माहिती दिली जाते.