मंडलाधिकारी ढेरे लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात
By Admin | Updated: July 19, 2014 00:37 IST2014-07-18T23:29:52+5:302014-07-19T00:37:31+5:30
अहमदनगर: घोडेगाव ता़ नेवासा येथील मंडलाधिकारी आप्पासाहेब भिमराज ढेरे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना
मंडलाधिकारी ढेरे लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात
अहमदनगर: घोडेगाव ता़ नेवासा येथील मंडलाधिकारी आप्पासाहेब भिमराज ढेरे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले़ तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून घोडेगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात पोलिसांनी ही कारवाई केली़
घोडेगाव येथील मंडलाधिकारी ढेरे यांनी मौजे शिंगवे तुकाई शिवारातील गट क्रमांक- ४५७ मधील खरेदी केलेली २२ आर शेत जमिनीची फेरफार नोंद मंजूर करून देतो़ मात्र त्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी त्यांनी संबंधिताकडे केली़ तक्रारदाराने ही रक्कम देण्याचे कबूल केले़ त्यानुसार तक्रारदार ठरल्याप्रमाणे रक्कम घेऊन कार्यालयात आले़ तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच ढेरे यांनी स्वीकारली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले़
याविषयी लाचलुचपत पथकाकडे तक्रार देण्यात आली होती़ या तक्रारीवरून पथकाने घोडेगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली़ लाचलुचपत पथकाचे उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ढेरे यांना रंगेहात पकडले़ या पथकात पोलीस निरीक्षक माळी, विजय मुतडक, पो़ कॉ़ वसंत वाव्हळ, काशिनाथ खराडे, कल्याण गाडे, अरविंद पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, श्रीपादसिंह ठाकूर, राजेंद्र सावंत यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)