आई, आजीमुळे वारकरी संप्रदायची आवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:55+5:302021-03-17T04:20:55+5:30
संत निळोबाराय महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी भोसले बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, ...

आई, आजीमुळे वारकरी संप्रदायची आवड
संत निळोबाराय महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी भोसले बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माउली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर, सुरेश पठारे, सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे, लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के, भाऊसाहेब लतांबळे, विजय गुगळे, रामराम पवार, वसंत गाजरे, अजिंक्य सावंत, सुनील कळसकर उपस्थित होते.
भोसले म्हणाले, नशिबात काय असेल ते सांगता येत नाही; परंतु आजी आणि आई पंढरपूरची वारी करत. तेव्हापासून वारकऱ्यांबाबत प्रेम, जिव्हाळा निर्माण झाला आहे. मी सोलापूरला असताना पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांचे नियोजन करण्याचे भाग्य मला लाभले.
................
वारकरी शिस्तबद्ध
वारकरी हा शिस्तबद्ध म्हणून ओळखला जातो. तो शिस्तीचे पालन करतो म्हणूनच ही वारकरी परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आपल्या दारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. हा संदेश वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वत्र पोहोचवतील याची मला खात्री आहे. निळोबाराय देवस्थानला काहीही कमी पडू देणार नाही, असेही भोसले म्हणाले.
फोटो : भोसले
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, आदी.