लोकमत दसरा-दिवाळी उत्सवाची शानदार सोडत

By Admin | Updated: December 18, 2015 23:15 IST2015-12-18T23:12:35+5:302015-12-18T23:15:58+5:30

अहमदनगर: अंगाला झोंबणारा गार वारा.. सोबतीला म्युझिक, मस्ती, आर्केस्ट्रॉचे झकास गाणे, अशा सुरेल झालेल्या जल्लोषात लोकमत आयोजित दसरा-दिवाळी खरेदीत्सोवाच्या बंपर बक्षिसाची सोडत काढण्यात आली

Lokmat Dasar-Diwali Festival | लोकमत दसरा-दिवाळी उत्सवाची शानदार सोडत

लोकमत दसरा-दिवाळी उत्सवाची शानदार सोडत

अहमदनगर: अंगाला झोंबणारा गार वारा.. सोबतीला म्युझिक, मस्ती, आर्केस्ट्रॉचे झकास गाणे, अशा सुरेल झालेल्या जल्लोषात लोकमत आयोजित दसरा-दिवाळी खरेदीत्सोवाच्या बंपर बक्षिसाची सोडत काढण्यात आली. नागापूर येथील दत्ता काळे यांना टाटा नॅनो तर जामखेड येथील बबन सोनबा जायभाये यांना बुलेटचे बक्षीस जिंकले.
लाभांचा पेटारा.. लाखोंची बक्षिसे.. असे स्लोगन असलेला लोकमत दसरा-दिवाळी खरेदी उत्सव १३ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. येथील माउली सभागृहात गुरुवारी सायंकाळी बंपर बक्षिसांची सोडत काढण्यात आली. ‘लोकमत’चे संस्थापक श्रध्देय स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून सोडतीस प्रारंभ करण्यात आला.या महोत्सवात ५० व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. सहभागी व्यावसायिक दुकानातून खरेदी केलेल्या ग्राहकांना कूपन (पान १ वरुन)
देण्यात आले होते. योजनेत दोन लाख ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या दोन लाख कुपन्समधून हुंडेकरी मोटर्सचे संचालक वसीम हुंडेकरी यांच्या हस्ते चिठ्ठी काढून टाटा नॅनो विजेता काढण्यात आला. नागापूर येथील दत्ता काळे यांना नॅनो मिळाली. एमआयडीसी भागातील योगीराज फर्निचरमधून त्यांनी खरेदी केली होती. दुसरे बुलेटचे बक्षीस संत नागेबाबा मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांच्या हस्ते काढण्यात आले. बुलेटचे हे बक्षीस जामखेड तालुक्यातील वंजारवाडीचे बबन सोनबा जायभाय यांना मिळाले. बेडरूमसेटचे तिसरे बक्षीस एस.एस.फर्निचरचे संचालक संजय ललवाणी यांच्या हस्ते काढण्यात आले. हे बक्षीस जामखेड येथील भागवत बडे यांना मिळाले. नगर एमआयडीसी येथील राहुल कातोरे व माळीवाडा येथील मोहन कदम यांना रेफ्रिजरेटरचे बक्षीस मिळाले. वॉशिंग मशीनचे सहावे बक्षीस पाटोदा तालुक्यातील नागेशवाडीचे अरुण शहादेव थोरावे आणि जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील सुवर्णा विजय वाघ यांना मिळाले.
चंदूकाका ज्वेलर्सचे संचालक अमित कोठारी, पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अमित पोखरणा, चंदूकाका सराफचे संचालक आनंद कोठारी,कांतीलाल कोठारी, आर.टी.कराचीवालाचे संचालक निखील, विशाल, सागर कराचीवाला, एस.एस.फर्निचरचे संजय ललवाणी, सिमरतमल कुंदनमलचे संचालक ईश्वर बोरा, जयहिंद कलेक्शनचे संचालक संतोष रोडे, हरिओम वस्त्र भांडारचे संचालक अंबादास कांडेकर, राज कलेक्शनचे विजय मुथा, शिंगवी चष्माघरचे अजित शिंगवी, आशिर्वाद क्लॉथ व कोठारी ज्वेलर्सचे अमोल ताथेड, कोठारी साडीज्चे अंकित कोठारी, ली चे संचालक नितीन सोनीमंडलेचा, गौरी ट्रेडर्सचे गिरीष लोखंडे, देवकर एजन्सीचे मच्छिंद्र देवकर, सनशाईन किचनचे सचिन शिलवंत,संगम ज्वेलर्सचे सरोज शेख पठाण, निर्मल एजन्सीचे रमेश बाफना, आशा पब्लिसीटीचे सुवेंद्र मुथा, अ‍ॅड. मॅजिकचे गुलशन आरोरा, गॅलॅक्सीचे राजेंद्र म्याना, साई अ‍ॅड्सचे कैलास दिघे, सिध्दीअ‍ॅडसचे प्रमोद गांधी, प्रसाद एजन्सीचे सचिन रसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या वाचकांच्या साक्षीने ही सोडत काढण्यात आली.
या योजनेसाठी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे कडुभाऊ काळे यांनी प्रायोजकत्व दिले होते. तसेच आर.टी.कराचीवाला द इलेक्ट्रॉनिक शॉपचे विशाल कराचीवाला, एस.एस.फर्निचरचे संजय ललवाणी यांनी गीफ्ट प्रायोजकत्व दिले. सोडतीच्या कार्यक्रमासाठी रुबी कॅथलॅबचे डॉ. एस.कदम, वरिष्ठ व्यवस्थापक दसासे, संकलेचा प्रॉपर्टीजचे दिनेश संकलेचा यांचे सहकार्य लाभले.
यंदाच्या लोकमत दसरा-दिवाळी महोत्सवाने सहभागी व्यावसायिक व ग्राहकांचा नवा विक्रम नोंदविला. या योजनेत जिल्ह्यातील नामांकित ५० व्यावसायिक सहभागी झाले होते. त्यात कापड, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी, बॅँकिंग, ज्वेलर्स, फर्निचर, मोबाईल, आॅटोमोबाईल अशा विविध व्यावसायिकांचा समावेश होता. या व्यावसायिकांकडे योजनेच्या काळात तब्बल दोन लाख ग्राहकांनी खरेदी केली.

Web Title: Lokmat Dasar-Diwali Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.