Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगरमधून अॅड.नामदेव वाकळे बसपाचे उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:47 IST2019-03-27T18:46:30+5:302019-03-27T18:47:21+5:30
महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे गठबंधन झाले असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून

Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगरमधून अॅड.नामदेव वाकळे बसपाचे उमेदवार
अहमदनगर : महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे गठबंधन झाले असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून अॅड.नामदेव अर्जुन वाकळे यांच्या उमेदवारीची घोषणा बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी केली.
सावेडी येथील माऊली सभागृह परिसरात झालेल्या बैठकित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करुन शिर्डी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओहोळ, जिल्हा महासचिव राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष राजू भिंगारदिवे, विधानसभा महासचिव नितीन भालेराव, सलिम शेख, महादेव पालवे, सुभाष पांडे, प्रा.अशोक डोंगरे, मनोज उघाडे उपस्थित होते.