कोपरगावात महिलेस अडवून हवेत गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 07:42 IST2019-07-18T07:42:22+5:302019-07-18T07:42:52+5:30

या घटनेने महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Locking women in the Kopargaon and firing in the air | कोपरगावात महिलेस अडवून हवेत गोळीबार 

कोपरगावात महिलेस अडवून हवेत गोळीबार 

कोपरगाव: दुकानतील पेसे घेऊन जाणाऱ्या महिलेस अज्ञात हल्लेखोरानी रस्त्यात अडवून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. हा प्रकार बुधवारी रात्री अकरा वाजता धारणगाव रोडवर घडला. 

धारणगाव रोडवरील किशोर वाईन्सच्या मालक माला धोगडी या रात्री अकराच्या सुमारास  नेहमीप्रमाने दुकानाचा गल्ला घेऊन दुचाकी वरुन घरी चालल्या होत्या. दरम्यान दोन हल्लेखोरांनी दुचाकीवर येत धोगडी यांना खुले नाट्यगृहनजीक रस्त्यात अडवून हवेत गोळीबार केला. मात्र आवाजाने आसपासचे लोक आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेने महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी पोलीस उप-अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देवून पाहणी केली.

Web Title: Locking women in the Kopargaon and firing in the air