‘माझी जीवनयात्रा’त जीवनातील पैलूंना उजाळा
By Admin | Updated: March 9, 2016 00:29 IST2016-03-09T00:26:24+5:302016-03-09T00:29:40+5:30
शेवगाव : ‘माझी जीवनयात्रा’ या जोत्स्ना कुलकर्णी यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘माझी जीवनयात्रा’त जीवनातील पैलूंना उजाळा
शेवगाव : जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित न्यू आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी जीवनयात्रा’ या जोत्स्ना कुलकर्णी यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कविता, उखाणे व गीते यांच्या माध्यमातून ‘मानवी जीवनाचा बालपण ते म्हातारपण’ असा प्रवास या कार्यक्रमातून उलगडताना कुलकर्णी यांनी माणसाच्या मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा यांचा वेध घेताना महिला व युवतींवरील संस्कार व जबाबदाऱ्या अधोरेखीत केल्या. एकाकी म्हातारपण, आईची माया, पती- पत्नी नात्यातील विसंगती, असे विविध विषय हाताळताना मनोरंजन व प्रबोधन करणारा हा कार्यक्रम उपस्थितांना भावला.
संयोजकांतर्फे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. रेखा शिंदे व लोकमततर्फे शाम पुरोहित यांनी ज्योत्स्ना कुलकर्णी यांचा सत्कार केला. कार्यक्रमास प्रा. भारत कर्डक, डॉ. विजय शहाणे, डॉ. प्रसाद पांडे, डॉ. सुवर्णा सोनवणे, उमेश घेवरीकर यांची उपस्थिती होती. अश्विनी गोल्हार हिने सूत्रसंचालन केले. हेमा आवारगंड यांनी आभार मानले. यावेळी महिला, विद्यार्थिनींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)