हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:46+5:302021-02-05T06:35:46+5:30
शिर्डी नगरपंचायतने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, महाद्वार चार समोरील साईपालखी उद्यानाचे आणि खंडोबा कॉम्प्लेक्सचे ...

हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देऊ
शिर्डी नगरपंचायतने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, महाद्वार चार समोरील साईपालखी उद्यानाचे आणि खंडोबा कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, अभय शेळके, अनिता जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, सुजीत गोंदकर, नितीन कोते, रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, अशोक गोंदकर, दीपक वारुळे, अॅड. अनिल शेजवळ, नितीन शेजवळ, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते, महेश लोढा, पोपट शिंदे, अशोक पवार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी उपस्थीत होते.
गोंदकर म्हणाले, विखे यांच्या नेतृत्वाखाली शहरात हॉकर्स झोन तयार करणे, झोपडपट्टी निर्मूलनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहरात झोन पद्धत बदलून मालमत्ताचे कर कमी करण्यासाठी, हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच साई कॉम्प्लेक्सचे भाडे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्योगाच्या दर्जामुळे कर, वीज बिल, कर्जाचे व्याजदर कमी होईल. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी लहान व्यवसायिकांसाठी हॉकर्स झोनची मागणी केली. तर अभय शेळके यांनी चार वर्षात नगरपंचायतच्या माध्यमातून चारशे कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले.
भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी नऊ मीटर मार्गावरील व त्रिकोणातील विस्थापित दुकानदारांच्या पुनर्वसनात विखे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली. यावेळी अनिता जगताप यांचेही भाषण झाले. अपंगांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.
( २८ शिर्डी विखे)