शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

किमान दोन वारकऱ्यांना पंढरीची वारी करू द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. जय भोसले व वासुदेव ...

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. जय भोसले व वासुदेव महाराज खेडकर आदी उपस्थित होते. कुलकर्णी यांनी सांगितले की, पंढरपूरच्या वारीबाबत सरकारने वारकऱ्यांना चर्चेला बोलावून दिशाभूल केली आहे. वारीला निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी मध्येच ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले, ही चुकीची बाब आहे. वारीची परंपरा ही मुघल व इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नव्हती. सध्या सर्वत्र जनजीवन सामान्य होत आहे. हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठ, लग्नसमारंभ सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरकारने वारकऱ्यांशी संवाद साधून काही नियम घालून वारीला परवानगी द्यावी. सकाळी प्रवासात अडचणी असल्यास वारकरी वारीचा रात्रीचा प्रवास करतील, तसेच कोरोना संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता माळरानावर मुक्काम करतील. ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने भजन दिंडी घेऊन जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आषाढी एकादशीपासून विविध धार्मिक ठिकाणी चातुर्मास, पारंपरिक उत्सव, सप्ताह, प्रवचने आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. यावरील बंधने सरकारने दूर करावीत. सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर दूर कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा यावेळी कुलकर्णी यांनी दिला. खेडकर महाराज यांनीही सरकारने नियम घालून देत वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली.