वीरगावात बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 1, 2016 00:51 IST2016-04-01T00:47:26+5:302016-04-01T00:51:31+5:30
गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले.

वीरगावात बिबट्याचा मृत्यू
गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले. मात्र, सकाळपासून मृतावस्थेत आढळलेला बिबट्या थेट संध्याकाळपर्यंत बेवारस पडलेला होता. त्याला पिंजऱ्यात न नेता एका साध्या गाडीत नेण्यात आले, पत्रकारांपासून माहिती लपवली, त्यामुळे या प्रकरणात वन विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
वीरगावमध्ये सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संध्याकाळी पाच वाजता रिक्षासारख्या एका लहान उघड्या गाडीत एका पोत्याच्या बारदानाखाली झाकून मृत बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेले. त्या वेळी शेजारील कांदे काढणाऱ्या महिलांनी त्यांना जाब विचारला. परंतु कर्मचाऱ्यांनी घाईत सोपस्कार उरकले. एवढ्या गुप्त व आडमुठेपणाने केलेल्या मृत बिबट्या नेण्यासाठी केलेला प्रकार संशयास्पद ठरला आहे. बिबट्याचा सदर प्रवास वन विभागाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.