शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल आणि टीव्ही पाहण्यातच गेले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

केडगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बंद असलेल्या शाळा अजूनही चिमुकल्यांच्या किलबिलाटाच्या प्रतीक्षेत आहेत. शाळा बंद, मैदानी खेळ बंद यामुळे ...

केडगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बंद असलेल्या शाळा अजूनही चिमुकल्यांच्या किलबिलाटाच्या प्रतीक्षेत आहेत. शाळा बंद, मैदानी खेळ बंद यामुळे दिवसभर फास्टफूड खात टीव्ही पाहणे आणि मोबाईलवर बोटे फिरविणे यातच लहान मुलांचा दिवस संपून जातो. यामुळे मुलांचे वाढत असलेले वजन आता नवी समस्या बनत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा आपल्या देशात शिरकाव झाला. शाळेतील लहान मुलांना याचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकारने तत्काळ १६ मार्च २०२० पासून शाळा बंद केल्या. इयता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा तर अद्यापही उघडू शकल्या नाहीत. सध्या दहावी व बारावीचे वर्ग थोडेफार नियमित सुरू आहेत. इतर वर्गातील मुले मात्र अजूनही कोरोनाच्या भीतीतून सावरले नाहीत. एरवी घरात कधी पायही न टेकविणारे मुले नेहमीच बाहेरच्या दुनियेत हरवून जात. मात्र लॉकडाऊनमुळे लहान मुलांना वर्षभर सक्तीने घरात राहण्यास भाग पाडले. सहकारी मित्रांसोबत मैदानी खेळ खेळणे, शाळेत मित्रांसोबत घरचा जेवणाचा डब्बा गप्पागोष्टी करत खाणे या आनंदाला मुले मुकली. याचा परिणाम म्हणून मुले दिवसभर मोबाईलवर गेम खेळणे, टिव्हीवरील कार्टुन पाहणे यातच आपला दिवस घालवू लागले. आता मुलांना हे सारे अंगवळणी पडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. विहाराबरोबर मुलांच्या आहारावरही याचा विपरित परिणाम होत आहे. रोजच्या आहारातील भाजी पोळीचा आहार मुलांना कंटाळवाणा वाटत असल्याने मुले आता फास्ट फूड, वेपर्स, बंद पाकिटातील खाद्यपदार्थ पाहत टीव्ही पाहणे यातच रमून जात आहे.

---

मुलांचा मोबाईल व टीव्हीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्क्रीन टाईम हा दहा पटीने वाढला आहे. मुलांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत स्थूलपणा, डोळ्यांचे प्रश्न वाढत आहेत. याबरोबरच मानसिक स्वास्थ्य ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पालकांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे.

त्यांना वाचनाची आवड लावली पाहिजे. थोडेफार घरगुती व्यायामाचे प्रकार मुलांना शिकवायला हवेत.

-डॉ. गणेश माने,

बालरोग तज्ज्ञ

---

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. यावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ देणे हा होय. पालकांनी मुलासोबत मित्रत्वाचे नाते निर्माण करणे होय. त्याद्वारे आहारातील चुकीच्या सवयी बदलणे व मुलासोबत स्वतः शारीरिक व बाैद्धिक खेळ खेळणे हे महत्त्वाचे आहे .

-डॉ . सचिन आहेर,

फॅमिली फिजिशियन

--

लहान मुलांनी घरात असताना शरीरास व्यायाम, व कष्ट होईल अशी कामे किंवा दोरीच्या उड्या, जम्पिंग, सूर्य नमस्कार, योग आसने नियमित करावीत. सोबत सर्व शुष्म व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे स्थूलता कमी होईल.

सोबत मुलांना आहाराबाबत हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, कणीस, गाजर, काकडी, बीट, रताळी यांचा पुरेसा वापर आणि ऋतूनुसार असणारी फळे यांचा वापर जास्त केला पाहिजे.

-सुनील गिरी,

योग अभ्यासक

---

मुलांनी काय करू नये..

जास्त वेळ स्क्रीन पाहणे, मोबाईल खेळणे, टीव्ही पाहणे याचा विपरित परिणाम मनावर व शरीरावर होत असल्याने याचा वापर फारच कमी करावा. अनियंत्रित आहारामुळे फास्टफूडमुळे वजन वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिभेला आवडणारे पदार्थ आहारातून बंद करावेत. बसताना पाठीला बाक येईल असे बसू नये.