कुरकुंडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:42 IST2020-02-28T15:41:26+5:302020-02-28T15:42:08+5:30
कुरकुंडी (ता.संगमनेर) परिसरातील गारोळेपठार येथील अशोक शांताराम वारे (वय २५) या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुरकुंडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
घारगाव : कुरकुंडी (ता.संगमनेर) परिसरातील गारोळेपठार येथील अशोक शांताराम वारे (वय २५) या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.२६) दुपारी एक वाजता घडली.
संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी परिसरातील गारोळे पठार येथील अशोक वारे या तरुणाने बुधवारी दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घरात आलेल्या नातेवाईकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत पोलीस पाटील विठ्ठल मेंगाळ यांनी घारगाव पोलिसांत खबर दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहेत.