कोकणगावात वडील अन मुलामध्ये किरकोळ वाद, गोळीबार नाही : पोलिसांचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 17:29 IST2018-05-03T17:23:46+5:302018-05-03T17:29:27+5:30
नगर - सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे भांडणातून झालेला गोळीबार ही अफवा असून गोेळीबार झाला नसल्याचा खुलासा पोलीसांनी केला आहे.

कोकणगावात वडील अन मुलामध्ये किरकोळ वाद, गोळीबार नाही : पोलिसांचा खुलासा
अहमदनगर : नगर - सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे भांडणातून झालेला गोळीबार ही अफवा असून गोेळीबार झाला नसल्याचा खुलासा पोलीसांनी केला आहे.
कोकणगाव येथे आज परशुराम सातपुते व त्यांचा मुलगा निलेश यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामध्ये परशुराम सातपुते यांनी त्यांच्याकडे असलेली बंदूक मुलाला घाबरविण्याकरीता त्याच्या अंगावर रोखली. या घटनेत सुरुवातीला गोळीबार झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत भोये, मनोज लातूरकर यांच्यासह पोलीस दल दाखल झाले. घटनेची शहानिशा करुन येथे गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.