नगरच्या प्रेमदान चौकातील स्वीट होमच्या किचनला आग; किचनमधील साहित्य भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:31 IST2020-05-13T10:30:17+5:302020-05-13T10:31:07+5:30

प्रेमदान चौकातील स्वीट होम या हॉटेलच्या किचनला बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुुमारास आग लागली. या आगीत किचन भस्मसात झाले.

The kitchen of the sweet home at Premdan Chowk in the town; The materials in the kitchen are burnt | नगरच्या प्रेमदान चौकातील स्वीट होमच्या किचनला आग; किचनमधील साहित्य भस्मसात

नगरच्या प्रेमदान चौकातील स्वीट होमच्या किचनला आग; किचनमधील साहित्य भस्मसात

अहमदनगर : प्रेमदान चौकातील स्वीट होम या हॉटेलच्या किचनला बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुुमारास आग लागली. या आगीत किचन भस्मसात झाले.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. किचनमधील चिमणीने छताचापेट घेतला. कीचन आतून तेलकट असल्याने आगीचा भडका उडाला. फक्त किचन जळाले आहे. इतर काही नुकसान झाले नाही. आग किरकोळ होती. अग्नीशमन बंब येताच आग आटोक्यात आली, असे हॉटेलचे संचालक धनेश बोगावत यांंनी सांगितले. 
 प्रोफेसर चौकातील अग्निशमन बंब सध्या बंद असल्याने गावातून गाडी यायला उशिर झाला. अन्यथा आग लवकर आटोक्यात आली असती. प्रोफेसर चौकात अग्नीशमन बंब असणे गरजेचे आहे.  कारण आग लागल्यानंतर सावेडीच्या कार्यालयात फोन लावण्यातच वेळ गेला, असेही बोगावत यांनी सांगितले. 
दरम्यान, स्वीट होमला आग लागल्याची माहिती मिळताच तेथे अग्निशमन बंब दाखल झाला. आग किरकोळ होती. ती तातडीने विझविली, असे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  

Web Title: The kitchen of the sweet home at Premdan Chowk in the town; The materials in the kitchen are burnt