शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमेश्वर मंदिरातील पुजा-यांवर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:43 IST

श्री मध्यमेश्वर मंदिरातील दोन महाराजांवर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

नेवासा : येथील श्री मध्यमेश्वर मंदिरातील दोन महाराजांवर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.    याबाबत योगी केशवनाथ महाराज (मुळगाव भायगाव ता. शेवगाव) यांनी जबाबात म्हटले आहे, मी रात्री मंदिरा बाहेर झोपलो होतो. रात्री बाराच्या दरम्यान तहान लागल्याने आतील खोलीत गेलो असता तीन अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश करुन पैसे कुठे आहेत? अशी विचारणा केली. मी कसले पैसे? असा प्रश्न केला असता चोरट्यांनी चाकूने माझ्यावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये माझ्या  डाव्या हाताची नस कापली. खोली बाहेर झोपलेले माझे गुरू योगी लक्ष्मणनाथ महाराज (मुळगाव गोरखपूर,उत्तर प्रदेश) ओरडा ऐकून आतील खोलीत आले असता एका चोरट्याने त्यांच्यावर कु-हाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीवर व डोक्यावर जखमा झाल्या आहेत. चौथा हल्लेखोर मंदिराबाहेर होता, असे केशवनाथ महाराजांचे म्हणणे आहे.    पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्यादृष्टीने अधिका-यांना सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची मदतघटनेनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जखमींना नेवासा येथील रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. योगी केशवनाथ महाराजांच्या जखमांमधून मोठा रक्तस्त्राव झाल्याने  मंदिर परिसरात रक्ताचा सडा पडला होता. चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांची मदत घेण्यात आली. श्वान पथकाने मंदिरापासून बस स्थानाकापर्यंत सुमारे एक किलो मीटर अंतरापर्यंत माग काढला.