केडगाव दुहेरी हत्यांकाड : अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 11:58 IST2018-04-08T11:57:59+5:302018-04-08T11:58:52+5:30

केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणाची दखल घेत शहरात तणाव निर्माण दाखल झाल्याने अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले आहे.

 Kedgaon double murder: Additional Director General of Police Bipin Bihari Nagar | केडगाव दुहेरी हत्यांकाड : अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल

केडगाव दुहेरी हत्यांकाड : अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल

ठळक मुद्देनगरमध्ये मोठा तणाव

अहमदनगर : केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणाची दखल घेत शहरात तणाव निर्माण दाखल झाल्याने अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले आहे.
हत्यांकाडानंतर नगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. हत्याकांडप्रकरणी पहाटेच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली तर कार्यालय तोडफोडप्रकणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर अप्पर पोलीस महासंचालक बिहारी नगरमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत पोलीस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली. या तणावाच्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबेही नगरमध्ये पोहोचले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा शिर्डी दौरा रद्द करण्यात आला आहे.

Web Title:  Kedgaon double murder: Additional Director General of Police Bipin Bihari Nagar